शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष समितीने केला रास्ता रोको

By admin | Updated: April 10, 2015 02:17 IST

वाशिम येथे विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठीआंदोलन; आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका.

वाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिम येथे त्वरित सुरू करण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र संघर्ष समिती व जिल्हय़ातील विविध संघटनांनी आज (९ एप्रिल) स्थानिक पोस्ट ऑफिसनजीकच्या जिजाऊ चौकात ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अकोला-नांदेड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी १६ आंदोलनकर्त्यांंना अटक करून त्यांची सुटका केली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिम येथे व्हावे, असा ठराव अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीत सन १९९५-९६ साली मंजूर झाला. यासंदर्भात विद्यापीठानेही शासनाकडे ठराव पाठविला आहे. त्यास तत्त्वत: मान्यता देऊन शासनाने वाशिम येथे विद्यापीठ उपकेंद्रासाठी जमीन अधिग्रहित करण्याची सूचना विद्यापीठाला केली होती. त्यानुसार, वाशिमलगतच्या बाभुळगाव येथे ई-क्लास गट नं. १८६-१८७ मधील १0२.९८ एकर जमीन विद्यापीठ उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आली. ही जमीन विद्यापीठाला हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव वाशिम जिल्हाधिकार्‍यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु हा प्रस्ताव सन २0१३ पासून आजपर्यंत शासनदरबारी प्रलंबित आहे. दरम्यान, विद्यापीठ उपकेंद्राकरिता जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना व विद्यापीठ उपकेंद्र तत्त्वत: वाशिम येथे मंजूर झाले असताना हे उपकेंद्र अकोला येथे स्थलांतरित करण्याचा घाट रचला जात आहे. या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले.