धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:47 IST2018-08-12T13:45:54+5:302018-08-12T13:47:13+5:30
अनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको!
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश नप्ते यांनी कळविली.
१३ आॅगस्टला सकाळी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली जाणार आहे. या आंदोलनात अनसिंग, वारला, वाई, जयपूर, ढिल्ली, पन्हाळा, वारा जहाँगीर आदी गावांमध्ये वास्तव्यास असलेले धनगर समाजबांधव सहभागी होतील. समाजातील शासकीय खासगी अधीकारी, कर्मचारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, समाजसेवक, विविध राजकीय पक्षातील धनगर समाजाचे पदाधिकारी, मेंढपाळ, शेतकरी, शेतमजूर, युवक, युवतींनी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाज, धनगर समाज आरक्षण कृती समिती व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.