Sting Operation : मतदान नोंदणी केंद्रांवर कर्मचारी अनुपस्थित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:05 PM2019-07-29T15:05:53+5:302019-07-29T15:06:21+5:30

. रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास स्टिंग आॅपरेशन केले असता, या केंद्रावर कुणीही आढळून आले नाही तर काही केंद्र कुलूपबंद आढळून आली.

Sting Operation: Employees absent at polling stations! | Sting Operation : मतदान नोंदणी केंद्रांवर कर्मचारी अनुपस्थित !

Sting Operation : मतदान नोंदणी केंद्रांवर कर्मचारी अनुपस्थित !

googlenewsNext


निनाद देशमुख 
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २८ जुलै रोजी मतदार नोंदणीकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली. रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास स्टिंग आॅपरेशन केले असता, या केंद्रावर कुणीही आढळून आले नाही तर काही केंद्र कुलूपबंद आढळून आली.
विशेष मतदान नोंदणी मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी व तहसिलदार मतदानकेंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील, अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिलेल्या होत्या. रिसोड शहर व ग्रामीण भागात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे किंवा नाही यासंदर्भात ‘लोकमत’ने २८ जुलै रोजी स्टिंग केले असता, अनेक मतदान केंद्रांवर धक्कादायक बाबी आढळून आल्या.
रिसोड शहरातील केवळ दोन मतदान केंद्राचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व मतदान केंद्रावर कर्मचाºयांची अनुपस्थिती आढळून आली. भारत प्राथमिक मराठी शाळा तसेच नगर परिषद मुलांची मराठी शाळा या दोन केंद्रावर कर्मचारी आढळून आले.
भारत माध्यमिक कन्या, शाळा भारत माध्यमिक विद्यालय, नगर परिषद उर्दू शाळा, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा, अल्लामा इकबाल उर्दू हायस्कूल, बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड आदी मतदान केंद्रांवर पाहणी केली असता, ही सर्व मतदान केंद्र बंद आढळून आले. त्यामुळे शहरातील नवमतदारांची गैरसोय झाली.
दरम्यान, यासंदर्भात काही कर्मचाºयांना कुणकूण लागली असता, संबंधित केंद्रांवर बसण्यासाठी जागा नव्हती असे सांगून बचावात्मक पवित्रा घेतला. यामधील काही मतदान केंद्रावरील शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याशी संपर्क साधला असता, बसण्याची व्यवस्था आहे असे सांगून मतदान केंद्रावरील कर्मचाºयांनी आम्हाला तशा कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या, असे स्पष्ट केले. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कर्मचारी आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व तहसिलदार राजेश सुरडकर यांनी रविवारी ग्रामीण भागात मतदान केंद्रांची पाहणी केली असता, अनेकजण गैरहजर आढळून आल्याची माहिती आहे.

रविवार हा मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असल्यामुळे संबंधित सर्व कर्मचाºयांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर कर्मचारी गैरहजर राहणे तसेच मतदान केंद्र कुलूपबंद राहणे हा गंभीर प्रकार आहे. गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात येतील.
- राजेश सुरडकर,
तहसीलदार, रिसोड

Web Title: Sting Operation: Employees absent at polling stations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.