शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संनियंत्रण कक्षातर्फे तक्रारींचे ‘ऑन दी स्पॉट’ निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:07 IST

वाशिम: जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांची खाते चौकशी, सेवानवृत्त प्रकरणे, ग्रामपंचायतची रेकॉर्ड तपासणी यासह अन्य प्रशासकीय प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने सनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अल्पावधीतच या कक्षाने तपासणीसाठी रेकॉर्ड उपलब्ध न करणार्‍या ग्रामसेवकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम रेकॉर्ड न देणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांची खाते चौकशी, सेवानवृत्त प्रकरणे, ग्रामपंचायतची रेकॉर्ड तपासणी यासह अन्य प्रशासकीय प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने सनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. अल्पावधीतच या कक्षाने तपासणीसाठी रेकॉर्ड उपलब्ध न करणार्‍या ग्रामसेवकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली आहे.प्रशासकीय कामकाजाला गती देणे, सुसूत्रता आणणे आणि प्रशासकीय प्रकरणांची हाताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, दिरंगाई करणार्‍यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करणे, खाते चौकशीला वेग देणे, सेवानवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांची प्रकरणे विहित मुदतीत तयार करून वित्त विभागाकडून मंजूर करून घेणे, जिल्हा परिषदमध्ये येणार्‍या तक्रारीपैकी गंभीर तक्रारींची चौकशी करणे, तक्रारीच्या अनुषंगाने घटनास्थळी जाऊन चौकशी करणे, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड (अभिलेखे) तपासणी करणे आदी कामे या सनियंत्रण कक्षावर सोपविण्यात आली आहेत. गत दीड महिन्यात या कक्षाने खाते चौकशीची ३५ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळविले आहे. संबंधित विभाग प्रमुखाच्या उपस्थितीत सुनावणी घेऊन दोन महिन्यात खाते चौकशी प्रकरण निकाली काढण्याचे बंधन या कक्षावर टाकण्यात आले आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी गंभीर स्वरूपाच्या काही तक्रारींची चौकशी या कक्षाने सुरू केली आहे. आतापर्यंत एकूण तीन प्रकरणांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड तपासणी करण्याचे अधिकारही या कक्षाला दिलेले आहेत. ४९१ पैकी ४५६ ग्रामपंचायतचे रेकॉर्ड तपासणी केली असून, उर्वरित ग्रामपंचायतने तपासणीसासाठी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाहीत. रेकॉर्ड उपलब्ध करून न देणार्‍या ग्रामसेवकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान ग्रामपंचायतकडून दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव असलेला तीन टक्के निधी खर्च होतो की नाही, याची माहितीदेखील घेतली जाणार आहे. याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे. सनियंत्रण कक्षामुळे कामचुकार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले असून, चौकशीअंती कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे सेवानवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांची सेवानवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली निघणार असल्याने अशा कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

प्रशासकीय कामकाजाला गती देण्याबरोबरच खाते चौकशीची प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे, तपासणीसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून न देणार्‍यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करणे यासह अन्य प्रशासकीय प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी सनियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. या कक्षाने सादर केलेल्या अहवालानुसार कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे.- गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.