शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने ओलांडला साडेपाच हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 17:00 IST

Soybeans rates crossed the five and a half thousand mark जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. शासनाने सोयाबीनला जेमतेम ३,८८० रुपये प्रती क्विंटलचे दर घोषित केले असताना जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यात रिसोड आणि मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांच्यावर दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत अल्पदराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही या शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदभार्तील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात वाशिम जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असून, बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. मंगरुळपीर आणि रिसोड येथील बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.


रिसोड बाजार समितीत सर्वाधिक दर
वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपयांहून अधिक झाले आहेत. गुरुवारी बाजार समितीकडून प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी कमाल ५,६०० रुपये प्रति क्विंटल, तर मंगरुळपीर बाजार समितीत कमाल ५,५४० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी झाली. जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच होते.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket committee washimबाजार समिती वाशिम