शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:47 IST

योजनेचा पुढचा टप्पा म्हणून १ एप्रिलपासून शिवभोजन योजना तालुक्याच्या ठिकाणीदेखील सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेची २६ जानेवारी पासून राज्यातील जिल्हास्तरावर अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून १ एप्रिलपासून शिवभोजन योजना तालुक्याच्या ठिकाणीदेखील सुरू होणार आहे.गरजू व गरीब व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे या उद्देशाने शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. पात्र लाभार्थीनुसार प्रत्येक जिल्ह्यात शिवभोजनालय सुरू करून थाळीचे उद्दिष्टही देण्यात आले. या योजनेची व्याप्ती १ एप्रिलपासून वाढविण्यात येणार असून, प्रत्येक तालुकास्तरावरही शिवभोजन मिळणार आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुकास्तरावर शिवभोजनालये सुरु करण्याची कार्यवाही केली आहे. १ एप्रिलपासून तालुकास्तरावर पात्र लाभार्थींना शिवभोजन मिळणार आहे. वाशिमसह अमरावती विभागात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथे प्रत्येकी २०० थाळी, तर मालेगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी १५० थाळीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितीने निश्चित केलेल्या शिवभोजनालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ घेता येणार आहे.

१ एप्रिलपासून तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात पूर्ण झाली आहे.- राजेंद्र जाधवजिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :washimवाशिम