मारहाणप्रकरणी दोन गटातील सात जणांवर गुन्हा दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:29 IST2019-04-19T14:28:58+5:302019-04-19T14:29:02+5:30

मंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.

Seven accused in two groups have been booked for rioting | मारहाणप्रकरणी दोन गटातील सात जणांवर गुन्हा दाखल !

मारहाणप्रकरणी दोन गटातील सात जणांवर गुन्हा दाखल !

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.
      पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विलास सावके रा हिरंगी यांनी तक्रार दिली की, १८ एप्रिल रोजी आरोपी रमेश चव्हाण,अविनाश चव्हाण व एक महिला रा हिरंगी यांनी फिर्यादिस मोबाईलवर सेल्फी फोटो काढण्याचे कारणावरून लोखंडी पाईप व लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२३,३२४,५०४,५०६,२९४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटातील फिर्यादी सरिता चव्हाण रा हिरंगी यांनी तक्रार दिली की १८ एप्रिल रोजी आरोपी प्रमोद सुर्वे,दत्ता सुर्वे रा लाठी, विलास सावके व एक महिला रा हिरंगी यांनी शिवीगाळ केली.  फिर्यादिने विचारले असता आरोपीनी लोखंडी पाईपने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली व धमकी दिली.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२३,३२४,५०४,३४ व अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Seven accused in two groups have been booked for rioting