झोपडीत ज्ञान सुर्य उगविणारी स्वावलंबी सविता

By Admin | Updated: October 2, 2014 01:06 IST2014-10-02T01:06:50+5:302014-10-02T01:06:50+5:30

गरिबीतही उजाळले स्वकष्टाने आयुष्य

Self-restrained Savita growing in knowledge of the hut in the hut | झोपडीत ज्ञान सुर्य उगविणारी स्वावलंबी सविता

झोपडीत ज्ञान सुर्य उगविणारी स्वावलंबी सविता

वाशिम : स्त्री म्हणूनी का होवू मी उदास,

       कारण दु:ख सहण्याचे साहस आहे माझ्यात

        या स्वरचित काव्य पंक्तीच्या बळावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन इयत्ता १२ वी मध्ये ९0 टक्के गुण मिळवून झोपडीत ज्ञान सुर्य उगविणार्‍या रिया जाधव हिला घडविण्यामागे तिची आई सविता जाधव या परितक्त्या महिलेचा सिंहाचा वाटा आहे. स्वावलंबी जिवन जगण्याचे बाळकडू अंगी असलेल्या सविता जाधव यांना पती संजय जाधव याने घटस्फोट न देता सोडून दिले. सन १९७७ मध्ये जन्मलेली मुलगी रियाचे वय जेमतेम एक वर्षाचे होते. हालअपेष्टा व यातनांची सुरुवात झाल्यानं तर सविता जाधव यांनी आपल्या झोपडी वजा घरामध्ये छोटेसे किरणा दुकान थाटले. नबिशी अठराविश्‍व दारिद्रय पाचविला पुजलेले असल्यामुळे सविता जाधव यांना चांगलीच मेहनत करावी लागायची. शिलाई काम व किरणा दुकानाचा व्यवसाय डबघाईस आल्यामुळे त्यांच्यावर मुलगी रिया सह उपासमारीची पाळी आली. मात्र स्वावलंबी असलेल्या जाधव यांनी तटपुंज्या पगारावर शहरातील एका शोरुममध्ये नौकरी स्विकारुन एकुलती एक असलेली मुलगी रिया हिला वाढवत चांगले संस्कार देत इयत्ता बारावी पर्यंत नव्हे तर उच्चशिक्षणा साठी प्रेरीत करुन तिचे आयुष्य घडविले. मुलगी रिया हिला वडिलांची कमतरता भासू न देता तिला तळहातावर खेळवून मोठे केले. हिम्मतीने तिचा सांभाळ करुन तिला यश मिळविण्याची प्रेरणा दिली. साक्षात नवदुर्गा बनून सविता जाधव यांनी आपल्या मुलीचा सांभाळ केला आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा संदेशच दिला आहे.

Web Title: Self-restrained Savita growing in knowledge of the hut in the hut