शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा; डॉक्टरांचाही अनुशेष !

By admin | Updated: April 20, 2017 15:57 IST

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे.

रिसोड : येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत.गत सहा महिन्यांपासून औषध निर्माता अधिकारी हे पद रिक्त असल्याने त्यांचे जागेवर इतर कर्मचाऱ्यांना बसवून औषधी वाटपाचे काम सुरु आहे. तीन वर्षापासून एक्सरे मशीन बंद पडल्याने क्ष -किरण कक्ष नेहमी बंद असतो. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. खोकल्यांचे औषध व अ‍ॅण्टीरॅबीज (श्वान दंश) लस गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध नसल्याने श्वानदंश झालेल्या रुग्णांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. ग्रामीण रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून बोअरवेल घेण्यात आला. बोअरची जलपातळी खोल गेल्याने मोजकेच पाणी येत आहे. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वापरासाठी लागणारे पाणी मिळत नाही. अन्य ठिकाणावरून  रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी आणावे लागत आहे. रुग्णालय परिसरात असलेले शवविच्छेदन गृह मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. या शवविच्छेदन गृहापर्यंत रस्ता नसल्याने रुग्णवाहिका नेता येत नाही. शवविच्छेदनासाठी आणलेले प्रेत स्ट्रेचरवर टाकुन न्यावे लागते. शवविच्छेदन गृहातील विज क नेक्शन बंद असल्याने रात्री अंधार राहतो. त्या कारणाने रात्री शवविच्छेदन होत नाही. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे मृतकाचे शवविच्छेदन केल्यानंतर पाणी आवश्यक असते. परंतु या ठिकाणी स्वतंत्र्य अथवा बोअरची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दुरवरुन पाणी आणावे लागते. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर चोपडे म्हणाले की, वैद्यकीय अधिक्षकांसह वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात यापुर्वीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविला आहे. अधिकारी, क र्मचारी व आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेकडून काम करुन घेतांना मोठी कसरत करावी लागत आहे, असे डॉ.चोपडे म्हणाले.