शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड-मादणी शिव रस्ता दुरुस्तीसाठी सरपंच, ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

रिसोड ते मादणी हा रस्ता रिसोड ते मेहकर या गावांना जोडणारा व अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वी हा रस्ता जिल्हा ...

रिसोड ते मादणी हा रस्ता रिसोड ते मेहकर या गावांना जोडणारा व अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. त्यामुळे या रस्त्यासाठी तुटपुंजा निधी प्राप्त व्हायचा; परंतु करडा ग्रामपंचायत सरपंचांनी वारंवार पाठपुरावा करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून घेतला. आता या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनेच काय, तर पायी चालतानाही त्रास होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत होते. त्यामुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन चालक या मार्गावर वाहने चालवितात. वाईट अवस्थेमुळेच या रस्त्यावरून मेहकर, रिसोड आगाराची बससेवा बंद झाली आहे. त्यामुळेच करडा, गोभणी, वडजी येथील सरपंचांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीबाबतचे ठराव पारित करून गुरुवारी ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली आणि उपविभागीय अभियंता डी. एस. खारोळे यांना निवेदन देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी केली. यावेळी प्रा. वसंतराव देशमुख करडा, अशोकराव देशमुख उपसरपंच गोभणी, संदीप धांडे पं. स. सदस्य रिसोड, प्रभाकर देशमुख सेवानिवृत्त तलाठी करडा यांच्यासह करडा, गोभणी, वडजी, धोडप येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००००००००

कोट: रिसोड ते मादणीदरम्यानच्या रस्त्याची अवस्था वाईट असल्याची जाणीव आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असून, येत्या एक ते दीड महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल.

-डी. सी. खारोळे,

उपविभागीय अभियंता, सा. बां. उपविभाग

००००००००००००००००००००

कोट: परिसरातील गावाकरिता हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. या रस्त्यावरील रिसोड, मेहकर ही बससेवाही बंद झाल्याने शेकडो ग्रामस्थांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी आमची मागणी आहे.

देशमुख,

सरपंच,

ग्रामपंचायत करडा