शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आज ठरणार वाशिम जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींचे कारभारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:59 AM

Sarpanch Election १५ फेब्रुवारी रोजी ७५ सरपंचपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.   

वाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर आता सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी ७५ सरपंचपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.   जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी प्रबळ दावेदारांची यादी मोठी असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून पॅनलप्रमुख विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसून येते. सरपंचपद मिळाले नाही, तर काही इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ऐनवेळी धक्कादायक निकालही लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ फेब्रुवारी रोजी तर १२ सरपंचपदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. वाशिम तालुक्यात १५ व १६ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १२ ग्रामपंचायत सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे. मानोरा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ फेब्रुवारी रोजी तर १६ फेब्रुवारी रोजी ९ आणि १७ फेब्रुवारी रोजी चार ग्रा.पं. सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे. मालेगाव तालुक्यात १५, १६ व १७ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १० ग्रामपंचायत सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे.

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात येणार आहे.- सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक