शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशामुळे अरुणावती नदीचे अस्तित्व धोक्यात; गावालाही धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:45 IST

Washim News जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे.

ठळक मुद्देबंदी असताना वाशिम जिल्ह्यात राजरोस वाळू उपसा सुरू आहे. रेती उत्खननाने जागाेजागी ५ ते ६ फूट खड्डे झाले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमानाेरा :  मानोरा शहरापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कारखेडा या एकाच गावातील अरुणावती नदी आणि खोराडी नाल्यांमध्ये दररोज जवळपास पाच ते दहा ट्रॅक्टरद्वारा अवैध वाळूचे उत्खनन मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरु असल्याने नदीचे अस्तित्व तर धाेक्यात आलेच आहे शिवाय याचा गावालाही धाेका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपासून वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. यामुळे अवैध वाळू तस्करीला उधाण आले आहे. मानाेरा तालुक्यातील कारखेडा येथील अरुणावती नदीमधील रेती उत्खनामुळे माेठया प्रमाणात रुंदी वाढली असून जागाेजागी ५ ते ६ फूट रेती उत्खननाने खड्डे झाले आहेत. जिल्हयातील रेती उत्खनन थांबावे याकरिता तालुकास्तरावर पथके सुध्दा नेमण्यात आले आहेत. या पथकाव्दारे माेठया प्रमाणात कारवाई सुरु असली तरी अवैध रेती उत्खनन सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

 पात्र रूंदावल्याचा गावाला, शेतीला फटकाअवैध वाळू उपसा हाेत असल्याने पर्यावरणाला धाेका निर्माण झाला आहेच, शिवाय भविष्यात अरुणावती नदी नजिक कारखेडा गावाला तसेच परिसरातील शेतीला याचा धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावा समिती स्थापन असून यांनी याकडे लक्षदेणे गरजेचे आहे. दररोज ८ ते १० ट्रॅक्टरचा हाेताेय वाळू उपसाकारखेडा या गावातून दररोज जवळपास पाच ते दहा ब्रास रेती उत्खनन आणि बेकायदेशीर विक्री होत असून खोराडी नाला आणि अरुणावती नदीच्या पात्राची चाळण हाेत आहे. गौण खनिज माफियांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू उपसा करीत असल्याचे चित्र कारखेडा परिसरातून दिसून येत आहे. वाळूघाटाचे लिलाव न झाल्याने जिल्ह्यात प्रशासन नियंत्रणबाह्य अवैधरित्या वाळूची चोरी सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.  केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण आघात मूल्यांकन निश्चित करण्यासाठी  जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल तयार करणे गरजेचे आहे- ॲड. श्रीकृष्ण राठाेड, पर्यावरण तज्ज्ञ, मानाेरा

टॅग्स :Manoraमानोराwashimवाशिमriverनदीsandवाळू