कारच्या धडकेने रोही ठार ; कारंजा-अमरावती मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:18 IST2018-05-10T17:18:39+5:302018-05-10T17:18:39+5:30
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला.

कारच्या धडकेने रोही ठार ; कारंजा-अमरावती मार्गावरील घटना
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. सुदैवाने यात मनुष्य जीवीतहानी झाली नाही.
अधिक माहितीनुसार एम. एच. २८ ए. एन. ३००२ क्रमांकाच्या इरटीका गाडीने काही मंडळी मेहकरवरून नागपूरकडे जात असताना कारंजा अमरावती मार्गावरील नंदनवन रेस्टॉरंटजवळ भरधाव वेगात असलेल्या गाडीसमोर अचानक रोही आडवा आल्याने गाडीची त्याला जबर धडक बसली. त्या धडकेत रोही जागीच ठार झाला. तर गाडी पुढे असलेल्या एम .एच. ४३ यु. ४७१६ क्रमांकाच्या ट्रकखाली घुसली. ही घटना १० मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यात सुदैवाने मनुष्यजीवीहानी झाली नाही. तसेच गाडीतील कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान कारंजा शहर पोलिस व वनविभागाच्या अधीकाºयांनी घटनास्थळी दाखल होवून घटनेची माहिती घेतली. तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्या मृत रोहीचा पंचनामा करून रोडच्या कडेला त्याला पुरवण्यात आले.