शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

मेडशी ते डव्हा पालखी रस्ता ठरतोय धोकदायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:49 PM

The road from Medashi to Dawa Palkhi is dangerous : सुरक्षा कठडेच नसल्याने  हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा धोकादायक ठरत आहे. 

- यशवंत हिवराळेलोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. सुकांडा गावा नजीक रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना सुरक्षा कठडेच नसल्याने  हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा धोकादायक ठरत आहे.  श्री क्षेत्र संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या  पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. काम पूर्णत्वाचा कालावधी संपल्यानंतरही अद्यापही काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालक तथा पादचाऱ्यांसह शेतकरी बांधवांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षाच्या कालावधीत मेडशी ते नाथनगरी श्री.क्षेत्र डव्हा या अकरा कि.मी. अंतराचे रस्त्यावर संबंधित ठेकेदाराकडून केवळ दगड मुरुमांचा भरावाच टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सद्य:स्थितीत या रस्त्यावर चिखल, पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून  वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे अपेक्षीत आहे.

पुलावर सुरक्षा कठडे नाहीत!ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले. या खड्ड्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे उभारण्यात आले नाहीत. पुलाच्या कामानजीक वाहनांसाठी वळण रस्ताच बनवण्यात आला नसल्याने वाहनधारकांना रस्त्याच्याकडेवरुन चिखलातून   वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. अनेकांची वाहने फसत आहेत. पुलाचे कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेले मुरूम व दगड व्यवस्थित न टाकल्याने नाल्यामध्ये पुराचे पाणी साचून शेतात शिरले आहे. 

मेडशी ते डव्हा या पालखी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत अनेकदा लेखी निवेदन दिले. परंतु त्याकडे संबंधितांकडुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या रस्त्यावर फुलांसाठी खोदून ठेवलेले खड्डे धोकादायक ठरत आहेत.                                             - कैलासराव घुगे, सरपंच सुकांडा

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग