शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

रिसोडला आणखी १५ दिवस मिळणार पिवळेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 16:15 IST

उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गेल्या १५ दिवसांपासून रिसोड शहराला अडोळ येथील प्रकल्पातून पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या पृष्ठभुमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाण्याची पाहणी केली आणि माहिती घेतली. उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील अडोळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तथापि, गेल्या १५ दिवसांपासून या धरणातून नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. या दुषित पाण्यामुळे आजाराची भिती असल्याने नागरिक कॅनचे पाणी विकत घेऊ लागले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन नगराध्यक्षांनी शनिवारी या धरणाची पाहणी केली. त्यावेळी एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यानंतर या धरणातील पाण्याचा रंग पिवळा होत असल्याचे येथे १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयाने सांगितले. तथापि, हे पाणी पिण्यास घातक नसून, एप्रिल महिना संपल्यानंतर पुन्हा पाणी निवळणार असल्याने हे पाणी पिण्यास हरकत नाही, असेही त्याने सांगितले.  नगर परिषदेने केले सर्व उपायअडोळ प्रकल्पातून रिसोड शहरात नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भिती निर्माण झाली होती. याची दखल नगर परिषद प्रशासनाने घेतली आणि पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची साफसफाई केली. त्यात आवश्यक त्या प्रमाणात तुरटीही टाकली. त्यामुळे पाणी निवळून स्वच्छ पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा होती; परंतु या सर्व उपाय योजनानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी पिवळेच असल्याचे आढळून आले. त्यात आता आणखी तुरटी टाकणे अपायकारक आहे. नगराध्यक्षांच्या मते पाणी योग्य वातावरणातील बदलामुळे रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ धरणाच्या पाण्याचा रंग पिवळा झाला आहे. तथापि, हे पाणी दुषित नसून, यामुळे आरोग्यास कुठलाही धोका नाही. नागरिकांनी हे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही, असे मत रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाना आसनकर यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी