शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

पाटील यांनी घेतला विकास कामांचा आढावा

By admin | Updated: February 27, 2015 00:49 IST

वाशिम जिल्हा आढावा बैठक; पालकमंत्र्यांनी दिल्या समन्वयाच्या सूचना; अखर्चित निधीची घेतली माहिती.

वाशिम : जिल्हा वार्षिक नियोजन तसेच राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात विविध शासकीय यंत्रणांनी राबविलेल्या विकास कामांची व खर्च झालेल्या निधीची माहिती आज २६ फेब्रुवारीला घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, सहकार संस्थांचे उपजिल्हा निबंधक श्री. खाडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, राजेश पारनाईक, तहसीलदार आशिष बिजवल, बी. डी. अरखराव, जनार्दन विधाते, अमोल कुंभार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक नियोजनमधील अखर्चित निधी खर्च करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही होण्याची गरज आहे. हा निधी खर्च करण्यासाठी काही अडचणी असतील तर त्याबाबत संबंधित विभागाकडून सविस्तर अहवाल मागवून घेण्याच्या सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे राबविली जावीत. या अभियानासाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील २00 गावांमधील जलसंधारणाची कामे एका वर्षात पूर्ण करायची असल्याने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले.