जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:40 PM2019-07-07T16:40:29+5:302019-07-07T16:40:36+5:30

रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे.

Resolution of allotment of five lakh seeds of tree | जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:   पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ºहास आणि त्यामुळे मानवी जीवनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत. जिल्ह्यातील रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वितरण करीत आहेत. 
रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित हे दोन जलदूत शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन गावागावांत जलजागृती करण्यासह गावकºयांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. जलसंधारणासह पर्जन्यमान वाढीसाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोघे आपापल्या गावांत वृक्ष लागवड मोहिम राबवित आहेतच शिवाय वृक्ष लागवडीसाठी जनतेला प्रोत्साहित करीत आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी म्हणून ते विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील एक भाग म्हणून त्यांनी जिल्हाभरात पाच लाख वृक्ष बिया वितरीत करण्याचा संकल्प केला आहे.  या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली असून, विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वाटप करीत आहेत. या वृक्षबिया रुजवून वृक्षरोपे तयार करण्यासह त्यांची लागवड करण्याचे आवाहनही ते संबंधितांना करीत आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हातभार लागावा, तसेच जिल्ह्यात निर्धारिक उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्षांची लागवड व्हावी म्हणून जलदूत अरविंद उचित आणि रविंद्र इंगोले विविध ठिकाणी पायपीट करीत वृक्षलागवडीसाठी जनतेला पे्ररित करीत आहेत. यासाठी त्यांनी  वृक्षबिया वितरणाचा संकल्प केला असून, प्रत्येक ठिकाणी केवळ पाच वृक्षबिया ते वाटप करीत आहेत. या वृक्षबियांच्या वितरणासाठी त्यांनी पाकिटे तयार केली आहेत. पाकिटे घेऊन ते विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, निमशासकीय संस्था, महिला बचतगटांकडे जात आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. 


 गावोगावी जनजागृती करणार
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्ष लागवड व्हावी आणि खºया  वाशिम जिल्हा पर्यावरण संवर्धनात अग्रेसर व्हावा म्हणून जलदूत रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित यांनी जिल्हाभरातील गावागावांत वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्याचेही ठरविले आहे.

Web Title: Resolution of allotment of five lakh seeds of tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम