नियमित याेग, प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ - डाॅ. भगवंतराव वानखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:03 IST2021-03-18T11:02:52+5:302021-03-18T11:03:03+5:30
Regular yoga, pranayama is good for health डाॅ. भगवंतराव वानखडे यांची लाेकमतच्यावतिने मुलाखत घेण्यात आली.

नियमित याेग, प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ - डाॅ. भगवंतराव वानखडे
वाशिम : जीवनात वेळ काढून नियमित याेग प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ राहते . याेग प्राणायमामुळे जीवनात रंग भरल्या जाऊ शकते असे प्रतिपादन डाॅ. भगवंतराव वानखडे यांनी केले. साेशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने माेफत याेग शिबीरे घेऊन नागरिकांना तणावमुक्त जीवनाचे धडे देणारे वाशिम येथील डाॅ. भगवंतराव वानखडे यांची लाेकमतच्यावतिने मुलाखत घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.
आपण याेग् क्षेत्रात कधीपासून कार्यरत आहात ?
- याेग क्षेत्रात मी २००५ पासून कार्यरत असून जवळपास १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. २००९ मध्ये पतंजली याेग पिठातून याेग शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
आपण केलेल्या कार्याचे समाधान कधी वाटले ?
- याेग शिबीरात नागरिक सहभागी हाेऊन आराेग्य सुरक्षित राहते . निशुल्क याेग शिबीरात अनेकांना याेगाबाबत माहिती व प्रशिक्षण दिल्याने अनेक याेग शिक्षक घडविल्याचे समाधान आहे.
- आपल्या कार्याबद्दल काय सांगाल ?
याेग शिबीर घेऊन नागरिकांचे आराेग्य अबाधित ठेवण्याचा माझा छाेटा प्रयत्न आहे. परंतु याची दखल अनेक सामाजिक संघटनांनी घेऊन मला माेठे केले आहे. मला नाशिक येथील तेजस फांउडेशनचा समाजभूषण राज्यस्तरिय पुरस्कार दिला आहे. साेबतच अनेक संघटनांनी मला सन्मानित केले आहे.
- आपल्या कार्यात काेणाचे माेलाचे याेगदान आहे ?
या सर्व सेवाकार्यामध्ये याेगासाठी येणारे नागरिक प्रेरणा देत असून माेलाचे सहकार्य शंकरराव उजळे, मुलगा रवि, स्नुषा दीपा यांचे सहकार्य मिळत आहे.