शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन

By admin | Updated: May 12, 2015 01:15 IST

दिवसाकाठी साडेचार लाख; इंझोरीच्या १५ शेतक-यांचा स्तुत्य प्रयोग.

नरेश आसावा/ मानोरा: तालुक्यातील १५ शेतकर्‍यांनी दुष्काळी स्थितीतही अभिनव पद्धतीने शेती करताना जवळपास २0 एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. हे १५ शेतकरी मिळून दरदिवशी अकराशे कॅरेट टोमॅटोची तोडणी करून त्याच्या विक्रीतून साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. गतवर्षी एवढय़ाच क्षेत्रातून या शेतकर्‍यांनी मिळून जवळपास ६0 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. यंदाच्या उत्पादनाचे प्रमाण पाहता या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीपेक्षा अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट दिसते. गत तीन वर्षांपासून राज्यभरातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटांमुळे गलितगात्र झाले असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील १५ शेतकर्‍यांनी नैसर्गिक संकटांपुढे हार न पत्करता अभिनव पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. हे शेतकरी गतवर्षीपासून एकत्रितपणे टोमॅटोची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. अडाण नदीच्या पात्रानजीक शेती असलेल्या या शेतकर्‍यांनी गतवर्षीपासून एकमेकांच्या सल्ल्यानुसार केलेला टोमॅटोच्या लागवडीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. या प्रयोगातून प्रत्येक शेतकर्‍याला जेमतेम सव्वा ते दीड एकर क्षेत्रात गतवर्षी अडीच ते पावणे तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले. या शेतकर्‍यांनी टोमॅटोची लागवड करण्यासाठी दज्रेदार संकरित बियाण्याची निवड केली, तसेच मालाची विक्री करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने बाजाराची निवड केली. टोमॅटोची लागवड करण्याच्या पद्धती आणि प्रक्रियेनुसार जमिनीचा आलटून पालटून वापर करावा लागत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या १५ शेतकर्‍यांनी त्या पद्धतीनुसार गतवर्षीचे क्षेत्र सोडून उर्वरित सव्वा ते दीड एकरात पुन्हा टोमॅटोची लागवड केली.