राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:45 IST2017-12-06T19:45:12+5:302017-12-06T19:45:26+5:30
शिरपूर जैन (वाशिम): काँग्रेसचे महासचिव खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलीसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे काँग्रेसच्यावतिने गुजरात सरकार व भाजपाचा निषेध मंगळवारी करण्यात आला.

राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे निषेध!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): काँग्रेसचे महासचिव खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलीसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे काँग्रेसच्यावतिने गुजरात सरकार व भाजपाचा निषेध मंगळवारी करण्यात आला.
या निषेध कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य वंदना गाभणे यांच्या मार्गदर्शनात माजी सभापती डॉ. श्याम गाभणे यांच्या उपस्थितीत बसस्थानक परिसरात शेकडो कार्यकतर्यांसह काँगे्रसच्यावतिने निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा व गुजरात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यात.
या निषेध सभेमध्ये माजी सरपंच गणेश भालेराव, अशोक भालेराव, उपसरपंच असलम परसुवाले, विनायकराव देशमुख, नंदकिशोर गोरे, अमित वाघमारे, ओंकार चोपडे, संतोष बाविस्कर, उत्तम अढागळे, मारीफ खॉ पठाण, मोहीब खॉ पठाण, मुख्तार खॉ पठाण, सै. दस्तगीर, अ. मुकीम, कपिल भालेराव, सोनु बोराटे, गजानन घिरके, अरुण गाभणे, माणिक ब्गायकवाड, प्रकाश भालेराव, प्रभाकर बाविस्कर, गणेश भालेराव, रहीम खॉ, कलीमभाई, शुभम भालेराव, भगवान घिरके, प्रतापराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.