शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने सरासरी अपेक्षित ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबरअखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात १ जून ते ३ सप्टेंबरदरम्यान ६८०.४० मि.मी. ...

जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबरअखेर ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात १ जून ते ३ सप्टेंबरदरम्यान ६८०.४० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधीत ७१४.९ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात होऊ शकली आहे. अर्थात आजवरच्या सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात पडला आहे. जिल्ह्याची सरासरी दमदार असली तरी तालुक्यांच्या स्वतंत्र सरासरीत मात्र वाशिम आणि कारंजा तालुक्यात आजवरच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आजवरच्या अपेक्षित सरासरीनुसार कारंजात ७ टक्के पावसाची तूट आहे, तर वाशिम तालुक्यात पावसाची ११ टक्के तूट आहे. दरम्यान, पिकांची स्थिती मात्र सध्या समाधानकारक असून, या दोन तालुक्यांतील काही महसूल मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुढील महिनाभराच्या कालावधीत दमदार पाऊस न पडल्यास ही या तालुक्यातील पावसाची तूट भरून निघू शकणार नाही, तसेच काही गावांत पाणीटंचाईची समस्याही उद्भवण्याची भीती आहे.

-------------------

गतवर्षीपेक्षा ४ टक्के कमी पाऊस

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते ३ सप्टेंबरदरम्यान ६८०.४० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ७१४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत कारंजा तालुक्यात ७४४.२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात गतवर्षी उपरोक्त कालावधीतील अपेक्षित सरासरीपेक्षा १२.७० टक्के अधिक पाऊस पडला होता. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ४ टक्के कमी आहे.

-------------------

जिल्ह्यातील पावसाची स्थिती

-१ जून ते ३० सप्टेंबर अपेक्षित पाऊस - ७८९.०० मि.मी.

-१ जून ते ३ सप्टेंबर अपेक्षित पाऊस - ६८०.४० मि.मी.

-१ जून ते ३ सप्टेंबर प्रत्यक्ष पाऊस - ७१४.९ मि.मी.