रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:40 AM2021-06-21T11:40:03+5:302021-06-21T11:40:12+5:30

Railway platform ticket Rs 30 : कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे.

Railway platform ticket Rs 30! | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

Next

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट वाशिम येथे पुन्हा ३० रुपये करण्यात आले आहेत. दुसरीकडे कोरोनाकाळात वाशिममार्गे धावणाºया पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने वाशिम येथे प्लॅटफॉर्म तिकिटही बंद ठेवण्यात आले आहे.
दुसºया टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. वाशिममार्गे तीन पॅसेंजर आणि काही विशेष रेल्वेगाड्या धावतात. दुसºया लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्सप्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. सध्या वाशिममार्गे काचीगुडा-नरखेड ही इंटरसिटी एक्सप्रेस तसेच तिरूपती-अमरावती, जयपूर-हैैदराबाद, जयपूर-सिकंदराबाद या चार गाड्यांच्या आठ फेºया आहेत. मध्यंतरी प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपये झाले होते. आता वाशिम येथे ३० रुपये आहे. 

 गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रेल्वे सेवाही प्रभावित झाली होती. पहिली लाट ओसरल्यामुळे काही काळासाठी रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत झाली. परंतू, त्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची दुसरी लाट आली. दुसºया लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा पुन्हा प्रभावित झाली. अनलॉकच्या टप्प्यात वाशिममार्गे काही एक्सप्रेस रेल्वे धावत आहेत. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
-  एम.टी. उजवे
स्टेशन मास्तर, वाशिम

Web Title: Railway platform ticket Rs 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.