शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे कर्करोगासंदर्भात जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:55 PM

वाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांनी केले.

ठळक मुद्देमुख कर्करोग विरोधी अभियान गावपातळीवरही तपासणी मोहिम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांनी केले.कर्करोग हा एक जीवघेणा आजार असून, वेळीच सतर्कता बाळगली तर या आजारापासून स्वत:ला कसे वाचविले जाऊ शकते, यासंदर्भात माहिती देण्यासाठी तसेच निदान व उपचारासाठी आरोग्य विभागातर्फे १ ते ३१ डिसेंबर या दरम्यान मुख कर्करोग विरोधी अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांत जनजागृती व तपासणी मोहिम सुरू आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाने मुख कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. देशात दरवर्षी तोंडाचा कर्करोग झालेले एक लाख रुग्ण आढळतात. यापैकी अनेकांचा मृत्यु वर्षभरात होतो, असा दावा आरोग्य विभागाने केला. मुख कर्करोगाची लक्षणे ३० ते ४० या वर्षादरम्यान दिसून येत असली तरी त्यांची सुरुवात तरुणपणात होते. मुख कर्करोग मुख्यत: तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो. मुख कर्करोग हा गाल, जिभ,टाळु, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय स्तरावर ३० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या तोंडाची तपासणी केली जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचीदेखील तपासणी करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत जनजागृती व तपासणी मोहिम सुरू राहणार आहे.  

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य