शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 4:17 PM

आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यासाठी बिंदु नामावलीची प्रक्रिया राबविण्यात आली. परंतू, यामध्ये वरिष्ठांनी त्रूटी काढल्याने त्रूटीची पुर्तता करण्याकामी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. तुर्तास पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ प्राथमिक शाळा असून, या शाळेवर तीन हजारापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. दर महिन्याला अनियमित वेतन, जीपीएफ पावत्यांचा हिशेब विहित मुदतीत न मिळणे, वैद्यकीय देयकांचा प्रश्न प्रलंबित आदींमुळे अगोदरच शिक्षक हैराण असताना आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी गत वर्षभरापासून प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. बिंदु नामावली पूर्ण झाल्यानंतर जवळपास ७४ शिक्षक हे मु्ख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी पात्र ठरलेले आहेत. आज ना उद्या पदोन्नती मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या या शिक्षकांना तीन महिन्यानंतरही पदोन्नती मिळाली नाही. शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव अमरावती येथील समाजकल्याणच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविल्यानंतर यामध्ये त्रूटी काढण्यात आल्या. त्रूटींची पुर्तता झाली नसल्याने पदोन्नती प्रक्रियादेखील रखडली आहे. ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती केव्हा मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.त्रूटींची पुर्तता लवकरच - अंबादास मानकरजिल्ह्यातील ७४ शिक्षक मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून बिंदु नामावलीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तेथे काही त्रूटी काढण्यात आल्या. त्यामुळे सदर प्रस्ताव परत आले. या प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता करण्यासाठी वाशिम येथे विशेष शिबिर घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव पाठविले जातील. पदोन्नतीची प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक समितीच्यावतीने नेहमीच शिक्षण विभागाशी चर्चा करून पाठपुरावा केला जातो. मुख्याध्यापक पदासाठी जिल्ह्यातील ७४ शिक्षक पात्र असल्याने या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढावी, यासंदर्भात प्राथमिम शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बिंदु नामावलीतील त्रूटींची पुर्तता करून तातडीने प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा, अशी मागणी आम्ही केली आहे, असे शिक्षक समितीचे (अमरावती विभाग)सरचिटणीस सतीश सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक