अवैध दारु वाहतुकप्रकरणी ४.१० लाखांचा मुददेमाल जप्त!
By संतोष वानखडे | Updated: June 12, 2023 17:59 IST2023-06-12T17:59:04+5:302023-06-12T17:59:47+5:30
एकूण ४,१०,९६० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

अवैध दारु वाहतुकप्रकरणी ४.१० लाखांचा मुददेमाल जप्त!
वाशिम : मंगरूळपीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अवैध दारू वाहतुकप्रकरणी कारवाई करत ४ लाख १० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मानिक चव्हाण, पोलिस कर्मचारी रविद्र कातखेडे, रामेश्वर राऊत , इस्माईल कालीवाले, मंगेश गादेकर,चालक अनिल हमाने यांनी अकोला रोडवर ही कारवाई केली. यात, अवैध दारु वाहतूक करणा-या वाहनाचा चालक मोहीत संजय लुल्ला याचेकडून ८० हजार ९६० रुपयाची देशी विदेशी दारु, ३.३० लाख किमतीचे एक चार चाकी वाहन व मोबाईल असा एकूण ४,१०,९६० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीवर कलम ६५ ई महाराष्ट्र दारु बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.