जलसंधारणाच्या कामांसाठी पिंपळखुटा ग्रामस्थांचं अथक श्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:40 IST2018-05-08T14:39:38+5:302018-05-08T14:40:16+5:30
सहा एकर क्षेत्रावर सीसीटीचं काम पूर्ण

जलसंधारणाच्या कामांसाठी पिंपळखुटा ग्रामस्थांचं अथक श्रमदान
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेंतर्गत पिंपळखुटा येथील ग्रामस्थ गाव पाणीदार करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. या गावातील प्रत्येक व्यक्ती श्रमदानात सहभागी झाली असून त्यांनी अथक परिश्रम करुन सहा एकर क्षेत्रावर सीसीटीचं काम केलंय.
पिंपळखुटा गावानं वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर सरपंच चंदा सुदर्शन धोटे आणि त्यांचे पती सुदर्शन धोटे यांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाचं काम सुरू केलंय. त्यामुळे ग्रामस्थही प्रेरित झाले आहेत. गावातील उजाड ई-क्लास जमिनीवर जलसंधारणाची कामं करण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थ श्रमदान करत आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून तब्बल सहा एकर क्षेत्रावर सीसीटीची कामे केली आहेत. या कामांमुळे जमिनीत लाखो लीटर पाणी मुरून त्याचा फायदा गावाला होणार आहे.