शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून तलावातील गाळाचा उपसा!

By admin | Updated: April 15, 2017 01:45 IST

कोंडाळा येथील ग्रामस्थांचा पुढाकार : तलावातून बाहेर पडला हजारो ट्राली गाळ

हरिभाऊ गावंडे - कोंडाळा महालीसिंचनासाठी पाणी मिळावे, तद्वतच गावात नेहमी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, या उदात्त हेतूने ग्रामस्थांनी शासकीय योजनेवर विसंबून न राहता स्वखर्चातून पाझर तलावातील गाळ हटविण्याचा निर्धार केला. पाहता-पाहता या सकारात्मक कामासाठी गावातून लाखो रुपये निधीदेखील गोळा झाला. त्यातून तलावातील हजारो ट्राली गाळ हटविण्यात ग्रामस्थांना यश मिळाले.कोंडाळा महाली या गावाची २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली होती. मात्र, जिल्ह्याच्या कृषी विभागाने त्यात खोडा घालून गावाचा समावेश ‘वॉटर न्युट्रल’मध्ये केल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातून वगळण्यात आले. गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या, शेळया, कोंबडया यासह सोयाबीन, तूर या पिकांना जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी गावात उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिल्यामुळे गावात जलयुक्त शिवार अभियानातून कुठलीच कामे झालेली नाहीत. दुसरीकडे सद्यस्थितीत गावातील पाझर तलावामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा शिल्लक नसल्याने गुरा-ढोरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच जलयुक्त शिवारमधून गावाला वगळल्यामुळे जलसंधारणाची कोणतीच कामे कोणत्याच योजनेतून किंवा कोणत्याही विभागाकडून यावर्षी करण्यात आली नाहीत. असे असताना कोंडाळा महाली येथील शेतकरी, ग्रामस्थांनी पाझर तलाव कोरडा पडल्यानंतर शासकीय योजना अथवा अनुदानाची वाट न पाहता हजारो ट्रॉली गाळाचा उपसा स्वखर्चाने करुन जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.तथापि, कृषि विभागाने खोडा घातला नसता, तर जलयुक्त शिवारमधून गावातील पाझर तलावाचा गाळ जेसीबी मशीनने ट्राली भरून देण्याचा खर्च शासनाकडून मिळाला असता. गावकऱ्यांच्या पुढाकारातून सध्या गावातील हा पाझर तलाव गाळमुक्त झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी किमान एकवेळ या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांच्या कामाचे कौतुक तरी करावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.