किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:38 PM2019-05-14T12:38:37+5:302019-05-14T12:38:55+5:30

मूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.

Pests threaten orange crop; Crop inspection by agricultural scientists | किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी

किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान शेतकºयांना मार्गदर्शन म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संत्रा फळबागेची पाहणी उपाययोजनांची माहिती दिली.
आॅरेंज व्हिलेज म्हणून मूंगळा या गावाची ओळख आहे. येथील बहुतांश शेतकरी संत्रा फळबागेकडे वळले आहेत. सद्यस्थितीत संत्रा फळबागेवर किडीने हल्ला चढविला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याची दखल घेत १३ मे रोजी कृषी शास्त्रज्ञांनी मूंगळा गावाला भेट देऊन मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे व फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांनी संत्रा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन व बहार व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मालेगाव तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर उपस्थित होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितले की, संत्रा पिकावर सद्यपरिस्थितीत ‘काळी माशी’ नामक किड असून यानंतर त्यावर कोळशी देखील येऊ शकते. परंतु त्यावर फवारणी केल्यास ही किड आटोक्यात येऊ शकते, याची माहिती शेतकºयांना दिली. कोणत्या किटकनाशकांची फवारणी करावी, याचीही माहिती दिली. किडीचा प्रादुर्भाव पाहून १५ दिवसांनी परत एक फवारणी करावी, असा सल्ला दिला. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांनी निंबोळची फवारणी ३५ मिली प्रति १० लिटर पाण्यात करावी किंवा चांगल्या प्रतीचे निंबोळी तेल ३५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असा सल्ला दिला. रासायनिक अथवा सेंद्रिय दोन्हीही फवारणीमध्ये झाड संपूर्ण ओले होईल अशा प्रकारे फवारणी आवश्यक आहे, असे डॉ. इंगळे व डॉ. पैठणकर यांनी सांगितले. यावेळी शेतकºयांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

Web Title: Pests threaten orange crop; Crop inspection by agricultural scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.