शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान, बालकांना जडतोय ‘मिस-सी’ आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही; तेच बालकांमध्ये ‘मिस-सी’ आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. जिल्ह्यातील ३० ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही; तेच बालकांमध्ये ‘मिस-सी’ आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक बालके या आजाराचा सामना करत असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. मात्र, ‘व्हायरल फिव्हर’मुळे हा दिलासाही तात्पुरता ठरत असून, नव-नव्या आजारांची लक्षणे आढळून येत असल्याने नागरिकांची डोकेदुखी थांबलेली नसल्याचे दिसून येते. वातावरणात बदल होत असल्याने सध्या बालकांमध्ये ‘व्हायरल फिव्हर’चे प्रमाण वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी आजाराने १५ वर्षांआतील बालके त्रस्त असल्याने पालकांची चिंताही वाढत आहे. त्यातच ‘मिस-सी’ आजाराची लक्षणे काही बालकांमध्ये आढळून येत असल्याने आरोग्य क्षेत्रही ढवळून निघत आहे. विविध आजारांच्या उपचारार्थ बालरुग्णालयांत गर्दी होत असून, काही बालकांमध्ये ‘मिस-सी’सदृश लक्षणे आढळत आहेत. डोळे व जीभ लाल होणे, जीभेवर सूज तसेच दोन्ही पाय सुजणे, अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे असलेल्या ‘मिस-सी’ आजाराने आरोग्य क्षेत्रासमोरही जणू नव्याने आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे बालकांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसून येताच, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरत आहे.

००००००

बॉक्स

‘मिस-सी’ आजाराची लक्षणे काय?

डोळे लाल होणे

जीभ लाल होणे

जीभेवर सूज येणे

अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे.

दोन्ही पायांवर सूज येणे.

रक्तदाब कमी होणे.

शॉकमध्ये जाण्याची शक्यता.

हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

००००००००००

डॉक्टर म्हणतात बालकांची काळजी घ्या!

कोट

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही बालकांमध्ये ‘मिस-सी’ आजाराची लक्षणे आढळत आहेत.

- डॉ. विजय कानडे,

बालरोग तज्ज्ञ, वाशिम

०००००

१५ वर्षांआतील बालकांमध्ये व्हायरल फिव्हर तर आहेच; याशिवाय ‘मिस-सी’ आजाराची लक्षणेदेखील आढळून येत आहेत. त्यामुळे पालकांनी बालकाच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहणे अपेक्षित आहे.

- डॉ. प्रवीण वानखेडे

बालरोग तज्ज्ञ, वाशिम

००००

बालकांना वेळीच उपचार मिळाले तर ‘मिस-सी’ आजार लवकर नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे डोळे व जीभ लाल होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तदाब कमी होणे आदी लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. रत्नेश परळकर

बालरोग तज्ज्ञ, वाशिम