वाशिम : पेरेपत्रक आणि शेती असल्याचा दाखला देण्याकरिता ५00 रुपयांची लाच मागणार्या तलाठय़ाला लाचलुचपत विभागाचा अधिकार्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मानोरा येथील सोमेश्वरनगरमध्ये पैसे घेताना रंगेहात पकडले. मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील तलाठी विष्णू भोयर यांनी सुरेश चव्हाण यांच्या माध्यमातून शेतकर्याला पेरेपत्रक व शेती असल्याचा दाखला देण्याकरिता ५00 रुपयांची मागणी केली होती. सदर शेतकर्याने या प्रकरणाची तक्रार वाशिम लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी तक्रारीनुसार सापळा रचून सोमेश्वर नगरमध्ये विष्णू भोयरला ५00 रूपयांची लाच घेताना अटक केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}