अकोला जिल्हा पोलिस दलातील १९५ पोलिस शिपायांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी या पोलिसांना पदोन्नती देण्यात आली असून, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १ मे रोजी हे आदेश दिले. ...
तालुक्यातील हिरपूर-सांजापूर येथील ग्रामस्थांनी मूर्तिजापूर ते दुर्गवाडादरम्यान रेतीची वाहतूक करणार्या वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. ...
तालुक्यातील बळेगाव येथे ग्रामसभा सुरू असताना काही लोकांनी महिला सरपंच व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...
जनता भाजी बाजारात बुधवारी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. बाजारात येणारे शेतकरी, कामगार, दुकानदार आणि ग्राहकांसाठी वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणार्या १५ कामगार महिलांचा कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीतर्फे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. ...
तेल्हारा तालुक्यातील नेर गाव विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...