शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

दारु विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

By admin | Updated: April 25, 2015 02:22 IST

दुकान तपासणीच्या सूचना; विक्रेत्यांकडून स्टिंगची दखल.

वाशिम : देशी-विदेशी दारू विक्रेते अल्पवयीन मुलांना दुकानामधून दारूच्या बाटलीची सर्रास विक्री कशी करतात, याचे कारनामे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने २४ एप्रिल रोजी चव्हाट्यावर आणताच, दारू विक्रेते आणि वाशिमच्या उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली. या स्टिंगची दखल घेत २४ एप्रिल रोजी विक्रेत्यांनी बालकांना दुकानांमध्ये प्रवेश नाकारले तर उत्पादन शुल्क विभाग वाशिमच्या अधीक्षकांनी दुकानांच्या तपासण्या करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या. देशी-विदेशी दारू दुकानांमधून १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दारू बाटलीची विक्री कदापिही करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी जिल्हा उत्पादन शुल्क विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात कितपत होत आहे, याची पडताळणी करण्यासाठी २३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील काही देशी-विदेशी दारू दुकानांमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. दारू दुकानांमध्ये कोणतीही चौकशी न करता, मागणी केल्यानुसार मुलांना हवी ती दारूची बाटली बिनधास्त दिली जात असल्याची बाब रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा शहरातील काही दारू दुकानांमध्ये स्टिंगने चव्हाट्यावर आणली होती. या वृत्ताची दखल घेत विक्रेत्यांनी २४ एप्रिल रोजी बालकांना दुकानांमध्ये प्रवेश नसल्याचे सांगितले. ह्यलोकमतह्ण प्रतिनिधींनी रिसोड, वाशिम व मंगरुळपीर शहरातील काही दुकानांमध्ये बालकांना २४ एप्रिल रोजी पाठविले होते; मात्र विक्रेत्यांनी या बालकांना दुकानात प्रवेश नसल्याचे सांगितले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक डी.जी. माळी यांनीदेखील दुकानांच्या तपासण्या करण्याचे आणि गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर्मचार्‍यांना दिले.