आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:40 IST2019-02-06T16:39:07+5:302019-02-06T16:40:03+5:30
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा असून, पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत.

आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा !
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पात केवळ २५ टक्के जलसाठा असून, पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत.
गतवर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने आसेगाव येथील प्रकल्पात ९० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा होता. त्यामुळे सिंचन तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी दिलासादायक परिस्थिती होती. परंतू, प्रकल्पात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू असल्याने सध्या या प्रकल्पात २५ टक्के जलसाठा आहे. पाण्याचा अमर्याद उपसा सुरू असतानाही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाण्याचा अवैध उपसा असाच सुरू राहिला तर आसेगाव परिसरात पाणीटंचाई गंभीर रुप धारण करू शकते, अशी भीती गावकºयांमधून वर्तविली जात आहे. काही शेतकरी तर परवाना नसतानाही या प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याचा उपसा करीत असल्याची माहिती आहे. प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाल्याने मत्स्योत्पादन व्यवसायही अडचणीत सापडला आहे, असे सनाउल्ला खान हसन खान यांनी सांगितले.