नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:45 IST2021-01-17T11:45:02+5:302021-01-17T11:45:09+5:30

Nagpur-Aurangabad expressway खाली पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारीला घडली.

One killed as truck overturns on Nagpur-Aurangabad expressway | नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू

नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क 
शिरपूर जैन : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील केनवड येथे चालत असताना अचानक खाली पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारीला घडली. संतप्त जमावाने काही तास रास्ता रोको आंदोलन केले. 
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केनवड येथे कोळगाव येथील अनिल प्रकाश पवार (वय २४) हा पायी चालत होता. चालता चालता तो रस्ता काम सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यावर पाय घसरून पडला. यावेळी औरंगाबादकडून येणारा (एम.एच.३४ बी जी ४३०९) ट्रक अंगावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त जमावाने दोन तास रास्ता रोको केला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, जमादार संजय घुले, तसेच मालेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed as truck overturns on Nagpur-Aurangabad expressway