ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:12 IST2020-06-15T17:11:16+5:302020-06-15T17:12:52+5:30

अंकूश भिमराव राठोड (३०), असे मृतकाचे नाव असून, रवि भिका राठोड (३३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. 

One killed, one seriously injured in tractor-bike accident | ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर  

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर  

लोकमत न्युज नेटवर्क 
आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढाव रूई मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अंकूश भिमराव राठोड (३०), असे मृतकाचे नाव असून, रवि भिका राठोड (३३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी लहू भिमराव राठोड (३३, रा. पाळोदी, ता. मानोरा) याने फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा भाऊ अंकूश भिमराव राठोड हा १४ जून रोजी रात्री रवि भिका राठोड याच्या मालकीच्या एमएच-२९, एएक्स ३४९२ क्रमांकाच्या दुचाकीने रुई येथून शेंदुरजना आढाव येथे जात होते. या दरम्यान लाल रंगाच्या एका ट्रॅक्टरचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अपघात घडून अंकूश राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रवि राठोड गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी एमएच-३७, एफ २३३० क्रमांकाचा ट्रॅक्टर तपासकामी ताब्यात घेतला असून, ट्रॅक्टरचालकावरकलम ३०४ (अ), ३७९, ३३७ सहकलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One killed, one seriously injured in tractor-bike accident