छतावरील विद्युत तारेला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:08 IST2021-07-10T11:08:16+5:302021-07-10T11:08:29+5:30

One died after touching an electric wire on the roof : मारोती सूर्यभान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली.

One died after touching an electric wire on the roof | छतावरील विद्युत तारेला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू

छतावरील विद्युत तारेला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार : घराच्या छतावरून गेलेल्या ११ केव्ही विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेलूबाजार येथील व्यवसायिक मारोती सूर्यभान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली.
गुरुदेव नगरातील रहिवासी मारोती चौधरी हे घराच्या छतावर कुत्रे आवाज करीत असल्याने त्यास हाकलण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी अनवधानाने लोखंडी पाईप हाती घेऊन कुत्रे हाकलण्याचा प्रयत्न केला. छतावरून गेलेल्या ११ केव्ही विद्युत तारेला लोखंडी पाईपचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा जबरदस्त धक्का लागला. 
घटनेनंतर लगेचच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अकोला येथे हलविण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  या घटनेमुळे शेलुबाजार येथे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. 
(वार्ताहर)
 

Web Title: One died after touching an electric wire on the roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.