शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत शनिवारी दाखल झाले असून, प्रतिक्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ...

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत शनिवारी दाखल झाले असून, प्रतिक्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ९४०० रुपये दर असल्याने नवीनच्या तुलनेत जुने सोयाबीनच भाव खात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागते. अल्पभूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की, बाजार समितीत विक्रीसाठी आणतात. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल, या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ४००० या दरम्यान प्रतिक्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. गत महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात चढउतार पहावयास मिळत आहे. आता नवीन सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. वाशिमच्या बाजार समितीत शनिवार, ४ सप्टेंबर रोजी नवीन सोयाबीन विक्रीसाठी आले. यावेळी या सोयाबीनला प्रतिक्विंटल ८२८१ रुपये भाव मिळाला. दुसरीकडे जुन्या सोयाबीनला मात्र ९४०० रुपये भाव मिळाला. नवीन सोयाबीन बाजार समितीत येत असल्याने हाच भाव कायम राहील का,असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००

भाव गडगडण्याची शक्यता

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने बाजारभाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. बाजारभाव गडगडले तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

०००००००००००००

शेतकरी म्हणतात बाजारभाव कायम रहावे.

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. आता सोयाबीन तयार होत असल्याने यापूर्वी असलेले बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, बाजारभाव पुन्हा गडगडतील, अशी दाट शक्यता आहे.

- पांडुरंग सोळंके

प्रगतिशील शेतकरी

००००

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांमधून जावे लागते. शनिवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनला आठ हजारांंवर भाव मिळाला. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. परंतु, हाच भाव यापुढेही कायम राहिला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- संजयकुमार सरनाईक

प्रगतिशील शेतकरी