वाशिम येथे वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय ‘कुलूपबंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 04:06 PM2018-12-04T16:06:55+5:302018-12-04T16:07:59+5:30

येथे एका भाड्याच्या जुनाट इमारतीत सुरू असलेले कार्यालय अडगळीत सापडले असून ते मंगळवार, ४ डिसेंबर रोजी ‘कुलूपबंद’ असल्याचे आढळून आले.

Office of the Department of waight and mesurement found locked | वाशिम येथे वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय ‘कुलूपबंद’

वाशिम येथे वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय ‘कुलूपबंद’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध स्वरूपातील साहित्य वजनमापांव्दारे विक्री करणाºया सर्व दुकानांमधील वजनकाट्यांची नियमित तपासणी, नुतनीकरण यासह तत्सम बाबींची जबाबदारी असलेल्या निरीक्षक वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार सद्या आलबेल झाला आहे. येथे एका भाड्याच्या जुनाट इमारतीत सुरू असलेले कार्यालय अडगळीत सापडले असून ते मंगळवार, ४ डिसेंबर रोजी ‘कुलूपबंद’ असल्याचे आढळून आले. 
वजनकाट्यांमध्ये हेराफेरी करून ग्राहकांची आर्थिक लूट करणाºया दोषी दुकानदारांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाची निर्मिती करण्यात आली. वाहनांमध्ये डिझेल, पेट्रोल कमी टाकले जात असल्यास वेळोवेळी तपासणी करून पेट्रोलपंपांवर कारवाई करणे, हॉटेल्स-रेस्टॉरेंटची तपासणी करून ग्राहकांना पुरविल्या जाणाºया साहित्याची तपासणी करण्यासह तत्सम बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागाला पेलावी लागते. प्रत्यक्षात मात्र वाशिम येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या कार्यालयाकडून कुठलीच ठोस कार्यवाहीची मोहिम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. 
विशेष गंभीर बाब म्हणजे या कार्यालयात सद्य:स्थितीत निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारीच कार्यरत असून ते आठवड्यातून केवळ एक दिवस अर्थात सोमवारी वाशिमच्या कार्यालयात बसून अन्य दिवशी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शिबिर घेण्याकरिता जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, कुलूपबंद असलेल्या वाशिमच्या कार्यालयात शिरपूर येथे शिबिर कार्यालय सुरू असल्याची नोट पाहून प्रत्यक्ष चौकशी केली असता, शिरपूरमध्ये कुठेही शिबिर सुरू नसल्याचा गंभीर प्रकार आढळून आला. एकूणच या सर्व बाबींवरून वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार सर्वच पातळ्यांवर ढेपाळल्याचे दिसून येत आहे.

कार्यालयीन इमारतीची वीजबत्ती गुल!
वैधमापन शास्त्र विभागाच्या वाशिम येथील भाड्याच्या कार्यालयाची सद्य:स्थितीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे. यासह अन्य स्वरूपातील विविध समस्या उभ्या झाल्या असून त्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


वैधमापन शास्त्र विभागात केवळ तीन कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यांनाच सर्व कामांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. अशाही स्थितीत कामांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- बी.बी. गायकवाड
निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, वाशिम

Web Title: Office of the Department of waight and mesurement found locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम