शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आता सोयाबीन पिकाला पोखरतोय ‘मिली बग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

जिल्ह्यात यंदा तीन लाख तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सुदैवाने यंदा शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका ...

जिल्ह्यात यंदा तीन लाख तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सुदैवाने यंदा शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला नाही. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे बहुतांशी चांगले उगवले; परंतु यानंतर निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकऱ्यांना पिच्छा पुरविला. वातावरणात विषमता निर्माण होऊन ती पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्यास पोषक ठरली. उडीद, मूग ही पिके कशीबशी वाचली, तर तुरीला अद्याप फुलोराही लागलेला नाही. त्यामुळे या पिकाला फारसा धोका नाही. तथापि, सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना आता या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. काही ठिकाणी व्हायरसच्या प्रादुर्भावाने पिकाचे नुकसान चालविले आहे, तर काही भागांत मिलीबग या किडीने सोयाबीनला पोखरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती असल्याने शेतकरी नव्याच संकटात सापडले आहेत.

---------------

काय आहे मिली बग

मीलीबग ही एक किड आहे. याला मराठी पिठ्या ढेकूण म्हणतात. हा अंडी न घालता पिल्याना जन्म देतो, अंगावर लोकरीसारख आवरण असल्याने सहसा कुठलही कीटकनाशक या किडीच्या शरीरात प्रवेश करत नाही. जास्वन्द, सीताफळ व पपई या पिकांवर प्रामुख्याने आढळतो.

-----------------

पिकाचे कसे नुकसान होते.

मीलीबग ही किड झाडातील रस शोषन करते व झाडाला कमजोर करते. फळा, फुलांची प्रत कमी करतो. या किडीचा सोयाबीन पिकावर अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाला, तर उत्पादनात मोठ्या घट निश्चितच होते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसताच ती उपटून बाहेर काढणेच योग्य.

------------------------

नियंत्रणासाठी उपाय

याला मिलीबग या कीडीचे प्रमाण प्रामुंख्याने शेताच्या बांधाकडील झाडावर अधिक दिसेन येते. या किडीचे वेळीच नियंत्रण करायचे असेल तर क्लोरोफायरीफॉस ४० मिली २० ईसीमध्ये मिसळून फवारणी केल्यास याचे नियंत्रण शक्य आहे.

------------------------

कोट: सोयाबीनचे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी या पिकावर व्हायरस आणि इतर रोगांचा तुरळक प्रादुर्भाव दिसत आहे, परंतु यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याने उत्पादनावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.

-------------------

जिल्ह्यातील सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र- ३००४१७ हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - ३०२६९२ हेक्टर

-------------------