शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ‘नो पेन्शन, नो वोट’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:57 PM

वाशिम : जुन्या पेन्शनपासून वंचित झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभरात ‘नो पेन्शन नो वोट’ आंदोलन राबविण्याचे ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जुन्या पेन्शनपासून वंचित झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभरात ‘नो पेन्शन नो वोट’ आंदोलन राबविण्याचे ठरविले आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संधटनेच्या वतीने अमरावती येथे ३ फेब्रुवारी रोजी महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जुनी पेन्शन हक्क संघटन राज्यभरातील सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत.राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) (पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना-डीसीपीएस) लागू केली आहे. यामुळे राज्यभरातील ३ लाखांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शनपासून वंचित झाले असून, शासनाच्या धोरणाविरोधात महाराष्ट्रात तीन वर्षांपासून जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने लढा देण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात या संघटनेच्या शाखा स्थापन करून वेळावेळी आंदोलने करण्यात आली. या शाखांच्या जोरावर नागपूर, मुंबई येथे भव्य राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली; परंतु शासनाकडून या आंदोलनाची दखलही घेण्यात आली नाही. राज्यकर्त्यांची नकारात्मक मानसिकता हेच यामागचे एकमेव कारण असल्याचे संघटनेचे मत आहे. यामुळे नवीन पेन्शन योजनेचे अंधकारमय भविष्य आणि जुन्या पेन्शन योजनेचे उज्वल भविष्य, तसेच कर्मचारी हीत याविषयावर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाºयांनी चर्चा करून ‘जुनी पेन्शन देण्याच्या मनस्थितीत असलेल्या राज्यकर्त्यांचाच यापुढे विचार करायचा, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या पेन्शनपासून वंचित असलेल्या कर्मचाºयांनी ‘नो पेन्शन, नो वोट’ हे आंदोलन राबविण्याचे ठरविले आहे. या आंदोलनासह संघटनेची पुढची दिशा काय, याबाबत निर्णय घेण्यासाठी अमरावती येथे कर्मचाºयांचा महामेळावा आणि जुनी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संबोधित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या मेळाव्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर बैठकीचे आयोजनही करण्यात येत आहे.  जे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतील. त्यांच्यासोबत आम्ही राहू. अन्यथा विरोधात मतदान करण्याची म्हणजेच ‘नो पेन्शन, नो वोट’ ही भुमिका संघटनेतील कर्मचाºयांची आहे.-बालाजी मोटेराज्यप्रसिध्दी प्रमुखजुनी पेन्शन हक्क संघटन  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी म्हणून ‘नो पेन्शन, नो वोट’ ही भूमिका घेण्यात आली असून, याबाबत निर्धारासाठी अमरावती येथे पेन्शन परिषद आयोजित केली आहे.-मिलींद सोळंकीजुनी पेन्शन हक्क संघटनविभाग अध्यक्ष अमरावती

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन