शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाच, १० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याबाबत सूचना नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:08 IST

Currency Note News जुन्या नोटा बंद होण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्र नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निमार्ण झाला आहे. दरम्यान, या जुन्या नोटा बंद होण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्र नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँकांसमोर रांगेत उभे राहावे लागले होते. आता जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे वृत्त सोशल मीडियात झळकत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा नाही. दुसरीकडे यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये थोडी संभ्रमावस्था असून, काही जण ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत धाव घेत आहेत.

बँकांना सूचना नाहीत!जुन्या पाच, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात जिल्ह्यातील बँकांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. सोशल मीडियात या नोटासंदर्भात वाचण्यात आले; परंतु अधिकृत पत्र किंवा सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे या नोटासंदर्भात तुर्तास तरी काही सांगता येणार नाही. काही नागरिक १०, १०० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करीत आहेत.

व्यापाऱ्यांकडून नोटांचा स्वीकार!जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने या नोटा अधिक संख्येने बाजारपेठेत येत असल्याचे दिसून येते. काही जण या नोटा बँकेत जमा करीत आहेत तर काही जण विविध प्रकारच्या साहित्य खरेदीत या नोटा वापरत आहेत.   व्यापारी मात्र पाच, १० व १०० रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याचे वाशिम शहरासह जिल्ह्यात दिसून येते. 

जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात सोशल मीडियात वाचण्यात आले आहे; परंतु वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणत्याही सूचना किंवा पत्र नाही. जिल्ह्यात या नोटा स्वीकारल्या जात आहेत.- दत्तात्रय निनावकर व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 

जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात अधिकृत काहीच नसल्याने या नोटा व्यापाऱ्यांकडून स्वीकारल्या जात आहेत. बँकांमध्येदेखील या नोटा स्वीकारण्यात येत आहेत.-आनंद चरखा जिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी संघटना वाशिम 

टॅग्स :washimवाशिमbankबँक