हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:53 IST2018-08-11T13:50:48+5:302018-08-11T13:53:08+5:30
हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही.

हवामानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणाच नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज कळावा आणि त्यानुसार नियोजन करता यावे म्हणून शासनाच्यावतीने महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली. या हवामान केंद्रांतील संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवरून जिल्हा स्तरावर दर दिवशी पाठविली जाते; परंतु अमरावती विभागात कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांना देण्याची यंत्रणाच विकसित केली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमापासून वंचितच आहेत.
हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकºयांचे नियोजन चुकते. दुबार पेरणीसह इतरही संकटाला शेतकºयांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी महावेध प्रकल्पांतर्गत सर्व महसूल मंडळात दोन हजार स्वयंचलित हवामान केंदे्र स्थापितही करण्यात आली. या हवामान केंद्रांमुळे ‘डिजिटल किआॅक्स’च्या माध्यमातून १२ बाय १२ किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटाला उपलब्ध होते. शेतकºयांना ‘एसएमएस’च्या माध्यमातून ती पाठविण्याचे ठरले होते. हवामानाचा अंदाज घेणाºया स्कायमॅट कंपनीच्या माध्यमातून ही हवामान केंदे्र स्थापित करण्यात आली आहेत. या हवामान केंद्रांद्वारे गावात किती पाऊस पडणार, कसा पडणार, केव्हा पडणार, तसेच कोणते पीक घेता येईल, सापेक्ष आर्द्रता, वाºयाचा वेग आणि दिशा यासह हवामानविषयक बदलाची सर्व माहिती शेतकºयांना प्राप्त होणे अपेक्षित आहे. दर दहा मिनिटाला या हवामान केंद्रात संकलित होणारी माहिती स्कायमॅटच्यावतीने राज्य शासनाच्या पोर्टलवर टाकण्यात येते आणि ती प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यातही येत आहे; परंतु अमरावती विभागात अद्याप कृषी विभागाने ही माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणाच विकसित केलेली नाही, त्यामुळे शासनाचा उद्देश असफल ठरला आहे.
हवामान केंद्रांत संकलित होणारी माहिती शेतकºयांपर्यंत नेमकी कशी पोहोचवायची, याबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. कृषी सहसंचालकांकडे यासंदर्भात मार्गदर्शन मागण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेतकºयांना हवामानाची माहिती पुरविण्यात येईल.
-दत्तात्रय गावसाने,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
वाशिम.