शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 15, 2017 01:16 IST

वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्हयात ३१ डिसेंबर २०१४ रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे १० हजार ४९० शेतकरी बाधीत झाले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील ८ हजार ३२४ शेतकऱ्यांच्या ३२२.५९ हेक्टरवरील गहू, २१६१.७२ हेक्टरवरील तूर, १३७.६७ हेक्टरवरील फळपिकांसह ६१.१८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. यासह मंगरूळपीर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या २०.६० हेक्टर क्षेत्रावरील फळपिके, कारंजा तालुक्यातील २ हजार १४८ शेतकऱ्यांच्या २२०.८० हेक्टरवरील गहू, ७४५.३६ हेक्टरवरील तूर, ३६ हेक्टरवरील फळपिके आणि ३८.६० हेक्टरवरील इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाने विनाविलंब नुकसानीचे सर्वेक्षण करून ४ हजार २३८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र, २ वर्षांचा मोठा काळ उलटूनही नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला अद्याप कुठलीच आर्थिक मदत मिळालेली नाही.