गोंडेगाव येथे युवकाची हत्या; चार संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:52 IST2020-05-05T17:51:45+5:302020-05-05T17:52:27+5:30

गोंडेगाव येथे ४ मे च्या मध्यरात्री एका ३८ वर्षीय युवकाची हत्या झाली.

Murder of youth at Gondegaon; Four suspects detained | गोंडेगाव येथे युवकाची हत्या; चार संशयित ताब्यात

गोंडेगाव येथे युवकाची हत्या; चार संशयित ताब्यात

मानोरा (वाशिम) : तालुक्यातील गोंडेगाव येथे ४ मे च्या मध्यरात्री एका ३८ वर्षीय युवकाची हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंडेगाव येथील विशाल रमेश ससाने (३८) या युवकास दोन बायका आहेत; मात्र त्यास दारूचे व्यसन असल्याने दोघीही त्याच्याजवळ राहत नाहीत. घटनेच्या रात्री आई-वडिल शेतात झोपण्यासाठी गेलेले होते; तर विशाल हा घराबाहेर अंगणात झोपलेला होता. अशात कुणीतरी त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, भगवान पायघन, पोलिस निरीक्षक शिशीर मानकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली. गावातील काही नागरिकांची चौकशी करण्यात आली असून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Murder of youth at Gondegaon; Four suspects detained