चुलत भावानेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:49 IST2020-01-12T14:49:36+5:302020-01-12T14:49:49+5:30

बालदेव परिसरात आरोपीने   दिलीप इंगोले यास दगडाने ठेचून ठार केले.

Murder by cousin | चुलत भावानेच केली हत्या

चुलत भावानेच केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : चुलत भावानेच चुलत भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शहरालगत असलेल्या बालदेव परिसरात उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश पुंडलीक इंगोले (वय ३५ वर्षे, रा. मोहरी, ह.मु. जांब रोड, मंगरुळपीर) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की आरोपी संतोष इंगोले (रा. मोहरी) व मृतक दिलीप इंगोले हे सख्खे चुलत भाऊ आहेत. १० जानेवारीला आरोपी संतोषची प्रकृती ठीक नसल्याने  दिलीप हा त्याला अकोला येथे दवाखान्यात घेऊन चालला होता; मात्र दवाखान्यात जाण्याची संतोषची इच्छा नव्हती. अशात बालदेव परिसरात आरोपीने   दिलीप इंगोले यास दगडाने ठेचून ठार केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव करित आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Murder by cousin