बेपत्ता मुलीचे प्रेत विहिरीत आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:22 IST2019-11-01T15:21:56+5:302019-11-01T15:22:01+5:30
भाग्यश्री मुरली कंकाळ ही मुलगी ३० आॅक्टोबर रोजीपासून बेपत्ता झाली होती.

बेपत्ता मुलीचे प्रेत विहिरीत आढळले!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील समता नगर अल्लाडा प्लॉटस्थित १२ वर्षिय बेपत्ता मुलीचे प्रेत घरानजिकच विहिरीत आढळून आल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली.
अल्लाडा प्लॉटमधील समता नगर येथील १२ वर्षिय भाग्यश्री मुरली कंकाळ ही मुलगी ३० आॅक्टोबर रोजीपासून बेपत्ता झाली होती. याबाबत नातेवाईकांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार ३० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान कोण्यातरी अज्ञात व्यक्तिने भाग्यश्रीला पळवून नेल्याचे म्हटले होते. यावरुन पोलीसांनी तक्रार नोंदवून नागरिकांना मुलीचे वर्णनाचा उल्लेख करीत कोणाला आढळल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार बळीराम गिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले होते. या घटनेतील तपास अधिकारी एल. आर. श्रीवास्तव यांच्या तपासणीनंतर सदर मुलीचे प्रेत घरानजिक विहिरीजवळ आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे एल.आर. श्रीवास्तव, इंगोले करीत आहेत.