शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 14:17 IST

व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतरही काही प्रमाणात शेतकºयांच्या हाती सोयाबिनचे उत्पादन आले. रब्बी हंगामातील खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी हा माल शेतकºयांनी विक्रीला आणणे सुरू केल्याने बाजार समितीत सर्वत्र सोयाबिनच दिसून येत आहे. असे असताना व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ हा तालुकाच नव्हे; तर वाशिम, मालेगाव तालुक्यातील काही गावांसह हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यातूनही शेतमाल विकायला येतो. यामुळे दरवर्षी खरीप हंगाम संपल्यानंतर आणि रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रामुख्याने सोयाबिन विक्रेत्या शेतकºयांची बाजार समितीत तोबा गर्दी होते. यामाध्यमातून होणाºया खरेदी-विक्रीच्या उलाढालीतून बाजार समितीला लाखो रुपयांचा शेष प्राप्त होतो. असे असताना बाजार समिती प्रशासनाकडून शेतकºयांना अपेक्षित सोयी-सुविधा अद्यापपर्यंत पुरविण्यात आलेल्या नाहीत. बाजार समितीच्या आवारात असलेल्या ओट्यांवर सदोदित व्यापाºयांचाच माल पडून असतो. परिणामी, ऐन हंगामात शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांना नाईलाजास्तव त्यांचा माल रस्त्यावरच टाकावा लागतो. तशीच परिस्थिती सद्याही उद्भवली असून बाजार समितीने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत सोयाबीन या मालाची आवक अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ओट्यांवर जागा नसल्यानेच सदर माल रस्त्यावर ठेवला जात आहे. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.- सुमनताई माधव भुतेकरसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

सत्ताधारी व व्यापारी यांचे संगणमत असल्यानेच व्यापाºयांचा माल ओट्यांवर; तर शेतकºयांचा माल रस्त्यावर ठेवला जात आहे. ओटे हे शेतकºयांसाठी असताना त्यांचीच गैरसोय होत असून त्यास सर्वस्वी बाजार समिती प्रशासनच जबाबदार आहे. हा प्रकार तत्काळ बंद व्हायला हवा.- डॉ. चंद्रशेखर देशमुखसंचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम