गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:57 IST2021-02-20T05:57:17+5:302021-02-20T05:57:17+5:30

-------- ’मग्रारोहयो’च्या सहयोगी संस्थेसाठी प्रस्ताव वाशिम: मग्रारोयोंतर्गत जिल्ह्यात केंद्र शासनाकडून निर्गमित मास्टर सर्क्युलर २०२०-२१ नुसार नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस मोड्यूल ...

Measures to avoid congestion | गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

--------

’मग्रारोहयो’च्या सहयोगी संस्थेसाठी प्रस्ताव

वाशिम: मग्रारोयोंतर्गत जिल्ह्यात केंद्र शासनाकडून निर्गमित मास्टर सर्क्युलर २०२०-२१ नुसार नीती आयोगाच्या एनजीओ-पीएस मोड्यूल अंतर्गत नोंदणीकृत संस्थांना मग्रारोयोची सहयोगी संस्था म्हणून सहभागी करून घेतले जात आहे. यासाठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव येत आहेत.

--

गाव विकास समिती कार्यालयात मार्गदर्शन

वाशिम: महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत रिसोड येथील लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील ८ गावांत गाव विकास समिती कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. या कार्यालयांत शुक्रवारी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

--------------

नवोदय परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी आवाहन

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वीच्या रिक्त जागेसाठीची परीक्षा २४ फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे, असे आवाहन प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे.

Web Title: Measures to avoid congestion