शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: June 19, 2017 19:04 IST

सुकेणकर लेन परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने पतीकडून होणाऱ्या वारंवारच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या



लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : सुकेणकर लेन परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने पतीकडून होणाऱ्या वारंवारच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रविवार (दि.१८) दुपारी सुकेणकर लेन येथील वसंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या हर्षा प्रशांत जैन (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रशांत जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंचवटीतील जैन याच्याबरोबर झाला होता. त्यानंतर पती प्रशांत याने वारंवार चारित्र्याचा संशय घेत तसेच घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. या छळाला कंटाळूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार सुरेश छगन सैतवाल (रा. रावेर, जिल्हा जळगाव) यांनी पंचवटी पोलिसांत दिली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मयत जैन हिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे उघड झाले असून, चिठ्ठी जप्त केली आहे, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.