शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती बंदचा शेतक-यांना फटका

By admin | Updated: October 23, 2014 01:06 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांची कमालीची कोंडी.

वाशिम : ऐन दिवाळीच्या मोसमातच २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर अशी सलग वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कमालीची कोंडी झाली आहे. बहुतांश शेतकरी दरवर्षी सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करतात. यंदाही तीच परिस्थिती होती. परंतु, बाजार समिती बंद असल्यामुळे सोन्यासारखे सोयाबीन कवड्यांच्या भावात विकावे लागत आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा हातातोंडाचा घास वाया गेला. यंदा विपरित हवामानामुळे पावसाअभावी सलग दुसर्‍यांदा खरीप हंगाम हातचा निघून गेला. प्रामुख्याने ७0 टक्के क्षेत्रावरील नगदी पीक सोयाबीन वाया गेल्याने दिवाळी व भाऊबीजचा बाजार कसा करावा? असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीही २१ ते २६ ऑक्टोबर अशी सलग बंद आहे. जे काही उत्पादन हाती आले ते खासगी व्यापार्‍यांना पडेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जिल्ह्यात ६0 टक्के हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदाही इतर पिकांऐवजी शेतकर्‍यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली. अधिक उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात खर्चही केला. एका एकरासाठी २७00 रूपयांची बॅग, ९00 ते ११00 रूपयांची खताची पिशवी मिळून ४000 रुपये लागवड खर्च लागला. दरम्यान, दोनदा खत आणि फवारणी मिळून किमान ३000 हजारांचा खर्च लागला. २७ ऑक्टोबरपासून बाजार समिती पुर्ववत सुरू होणार आहे.